¡Sorpréndeme!

Chandni Chowk Bridge Demolition | पूल पाडणार पण प्रशासनासंदर्भात स्थानिकांच्या काय आहेत तक्रारी?

2022-09-29 248 Dailymotion

पुण्यातील चांदणी चौकातला पूल २ ऑक्टोबरला पाडला जाणार आहे. पण अजूनही अधिकृत सूचना आली नसल्याचं सोसायटीतील रहिवाशांचं म्हणणं आहे. शनिवारी रात्री ११ पासून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे आणि मध्यरात्री पूल पाडणार असल्याच्या बातम्या वर्तमानपत्रातून, समाजमाध्यमातून समजल्या. परंतु प्रत्यक्षात, लेखी अशी कोणतीही सूचना, माहिती आम्हाला मिळाली नाही असे चांदणीचौक परिसरातील रहिवाशांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितलंय.